ठाण्यातील आशा सेवकांची ‘दिवाळी भेट’ थेट बॅंकेत जमा

ठाणे – ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग २ ते ४ च्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानासह ऑक्टोंबर महिन्याचे वेतन पालिकेने दिवाळी पूर्वीच दिले असून आशा सेविकांनाही पालिकेने सहा हजार रुपयांची दिवाळी भेट दिली आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांबरोबरच आशा सेविकांची दिवाळी गोड झाली आहे.

दिवाळी सणाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येते. यंदा २४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले होते. या आदेशानंतर दिवाळीपूर्वीच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्याचे काम पालिकेने सुरू केले होते. यामध्ये वर्ग एक च्या अधिकाऱ्यांनी सानुग्रह अनुदान घ्यायचे नाही असा निर्णय घेतला असून यामुळे वर्ग २ ते वर्ग ४ च्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पालिकेने सानुग्रह अनुदानाच्या रक्कमेसह ऑक्टोबर महिन्याचे वेतन जमा केले आहे. आशा सेविकांना देण्यात येणारी सहा हजार रुपयांची दिवाळी भेट दिवाळीपूर्वीच बॅंक खात्यात जमा करण्यात आली आहे. त्यामुळे आशा सेविका आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top