ठाणे –
मीरा-भाईंदर शहरातील अंतर्गत रस्ते आणि ठाणे-घोडबंदर मार्गावर खड्ड्यांची चाळण झाली आहे. ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यात गेल्या वर्षी या भागात रस्त्यावरील खड्डयांमुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. खड्डयांची संख्या फारच जास्त असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत.
ठाणे – घोडबंदर रोडव्यतिरिक्त मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गातही खड्डे पडलेले आहेत. खड्डेमय रस्त्यातून वाहन चालवल्याने पाठीचा त्रास, मान दुखणे, मणक्याचा त्रास अशा अनेक विविध शारीरिक आजारांचा सामना करावा लागतो. यामुळे वाहनचालक नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान, मीरा-भाईंदर शहरात अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमध्ये मुरूम भरण्याचे काम सुरू झाले आहे.