ठाणे – ठाण्याचे माजी महापौर आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक राऊळ (७५) यांचे काल रात्री दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे.
१९८६ मध्ये राऊळ ठाणे महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. १९९१-९२ या काळात ते ठाण्याचे महापौर बनले. १९८६ ते २०२२ या काळात ते सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. सुरूवातीला ते काँग्रेस पक्षात होते. १९९९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यावर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांची साथ दिली. यानंतर ते राष्ट्रवादी पक्षातून नगरसेवक म्हणून निवडुन आले. २०१७ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम करत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून ते नगरसेवक झाले होते. शांत, संयमी आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती.
ठाण्याचे माजी महापौर अशोक राऊळ यांचे निधन
