ठाणे – ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ६६ लाख शिलकीसह ५६४५ कोटींचा अर्थसंकल्प आज सादर केला. यात ३७२२ कोटी ९३ लाख महसुली खर्च आणि १९२१ कोटी ४१ लाख भांडवली खर्चाचा समावेश आहे.त्यासोबत कोणत्याही स्वरुपाची करवाढ अथवा दरवाढ करण्यात आलेली नाही.नवे प्रकल्प हे पीपीपी तत्वावर राबवण्यात येणार आहेत.पालिकेच्या तिजोरीवर कोणत्याही स्वरुपाचा भार न देता काटकसरीचा हा अर्थसंकल्प असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी अनुदानापोटी २८४ कोटी अपेक्षित धरण्यात आले असताना ९१४ कोटींचे अनुदान मिळाल्यानेच यंदाच्या अर्थसंकल्पात ६२० कोटींची वाढ झाली. २०२४-२५ चे ५०२५ कोटींचा मूळ अर्थसंकल्प सुधारीत करुन आरंभीच्या शिल्लकेसह ६५५० कोटी आणि २०२५-२६ च्या आरंभीच्या शिल्लकेसह ५६४५ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
ठाणे पालिकेचा अर्थसंकल्प दर आणि करवाढ नाही
