Home / News / ठाणे पालिका कर्मचार्‍यांना २४ हजार बोनस मिळणार

ठाणे पालिका कर्मचार्‍यांना २४ हजार बोनस मिळणार

ठाणे- ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. कर्मचाऱ्यांना २४००० रुपये एवढा सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

ठाणे- ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. कर्मचाऱ्यांना २४००० रुपये एवढा सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली.

ठाण्यातील ‘आनंद कुटीर’ मुख्यमंत्री शिंदे या बोनसबाबत घोषणा केली. यावेळी खासदार नरेश म्हस्के,आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, मीनल संख्ये,पालिका आयुक्त सौरभ राव,अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी.गोदेपूरे आणि उमेश बिरारी उपस्थित होते. ठाणे महापालिकेने गेल्यावर्षी २१ हजार ५०० रुपये रुपये इतके सानुग्रह अनुदान दिले होते. त्यात अडीच हजार रूपयांची वाढ करून २४ हजार रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या