ठाणे जिल्ह्यात सप्टेंबरपासून कुत्रे, बैल, गायी म्हशींची गणना

ठाणे- ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात कुत्र्यांसह बकरे,गाई,बैल, शेळ्या-मेंढ्या आहेत. याची गणना सप्टेंबरमध्ये होणार आहे.घरोघरी जाऊन आणि पशुपालन संस्थांमध्ये ही पशुगणना होणार आहे. त्यासाठी महापालिका सहाय्य करणार असून प्रथमच मोबाइलमार्फत ही गणना प्रगणक करणार आहेत.४ हजार घरामागे एका प्रगणकाला काम करावे लागणार असल्याची माहिती डॉ‌.वल्लभ जोशी, जिल्हा पशसंवर्धन उपआयुक्त ठाणे,जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.समीर तोडणकर यांनी दिली.

देशात दर ५ वर्षांनी ही जनगणना केली जाते. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने आतापर्यंत अशा २० जनगणना केल्या आहेत.पशुगणना केवळ धोरणकर्त्यांसाठीच नाही तर शेतकरी,व्यापारी, उद्योजक, दुग्धउद्योग, सर्वसामान्यांसाठीही फायदेशीर ठरते. यामुळे पशुधनासाठी धोरण आखणे सोप्पे जाते.२०वी पशुगणना २०१९ मध्ये झाली होती आणि आता ही गणना देशभरात होत असताना ठाणे जिल्ह्यातदेखील केली जाणार आहे.

ही पशुगणना करण्यासाठी ग्रामीण भागात ७२ प्रगणक, १४ पर्यवेक्षक असून एकूण ८६ कर्मचारी तसेच शहरी भागात २५६ प्रगणक, ४७ पर्यवेक्षक असून एकूण ३०३ कर्मचारी कार्यरत असणार आहेत.४ हजार घरांमागे एका प्रगणकाला गणना करण्याची जबाबदारी असेल.तर १० प्रगणकांमागे एक पर्यवेक्षक काम पाहणार आहे.मोबाइल ॲपमार्फत ही गणना होणार असून ती ३ महिने चालेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top