मुंबई – पुणे जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बाळासाहेब चांदेरे यांच्याबद्दल तक्रारी येत होत्या.मूळ आणि कट्टर शिवसैनिकांना पदापासून डावलण्याचे काम बाळासाहेब चांदेरे हे करीत असल्याबद्दल भोर आणि वेल्हे तालुक्यातील शेकडो शिवसैनिकांनी राजीनामे दिले होते.त्यांच्याबद्दलचा असंतोष वाढत चालल्यामुळेच पक्ष प्रमुखांनी अखेर चांदेरे यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.