मुंबई- काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक झाल्यानंतर तिला वेग आला असून, काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांच्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत बोलणी करण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार आज बाळासाहेब थोरात यांनी आधी शरद पवार आणि नंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरेंसोबत तब्बल अडीच तास थोरातांनी चर्चा केली. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे आणि शरद पवारांना काय वाटते, या गोष्टी मी समजून घेतल्या आहेत. आता आम्ही एकत्र बसून मार्ग काढू. केवळ थोड्या जागांवर आमची चर्चा चालू आहे. आमची दिल्लीत चर्चा झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी बैठक घेत आहोत.
महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटला नाही. जागावाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये तणावाची स्थिती आहे. त्यामुळे उमेदवाराच्या यादीला विलंब होत आहे. दरम्यान आता घडामोडींना वेग आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला आहे.
ठाकरे आणि थोरांत यांच्यामध्ये जागावाटपाबाबत अडीच तास चर्चा
