ट्विटरचे सर्व व्हेरीफाईड
अकाऊंट अनफॉलो

न्यूयॉर्क
ट्विटरने आता पुन्हा एकदा आयकॉनिक लोगो ठेवला आहे. हा लोगो ठेवत असताना आणखी एक बदल करण्यात आला आहे. ट्विटर व्हेरीफाईडकडून ट्विटरचे सर्व व्हेरीफाईड अकाऊंट अनफॉलो करण्यात आले. जवळपास 2 लाख 25 हजार अकाऊंट्स अनफॉलो झाले आहे. यापुढे ट्विटर व्हेरिफाईड कोणालाही फॉलो करणार नाही.
इलॉन मस्क यांनी ट्विटरचा कारभार हाती घेतल्यापासून ट्विटरमध्ये अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ट्विटरचा आयकॉनिक लोगो ब्लू बर्ड काढून त्याऐवजी कुत्राचा फोटो होमपेजवर ठेवला होता. यातच आता ट्विटर व्हेरिफाईडकडून सर्व व्हेरीफाईड अकाऊंट अनफॉलो करण्यात आले आहेत.
ट्विटर सुमारे 4 लाख 20 हजार व्हेरिफाईड अकाउंट्सना फॉलो करत होते. तसेच कंपनीने ट्विटर ब्लू पॉलिसी आणल्यानंतर एक एप्रिलपासून सर्व व्हेरिफाईड अकाउंट्स बंद करण्याचा आणि त्या वापरकर्त्यांसाठी चेकमार्क (ब्लू टिक) काढून टाकण्याचा इशारा देखील दिला होता. सीईओ एलॉन मस्क यांनी स्पष्ट केले होते की, ज्या युजर्सकडे ट्विटर ब्लूची मेंबरशिप नाही, त्यांच्या अकाउंटवरून ब्लू टिक काढून टाकण्यात येईल.

Scroll to Top