ट्रेनमध्ये पॉर्न चित्रपट पाहू नका ब्रिटीश कंपनीची प्रवाशांना सूचना

लंडन – ब्रिटनच्या नॉर्दन रेल्वे कंपनीने प्रवाशांना ट्रेनमध्ये पॉर्न चित्रपट न पाहण्याचा सूचना केली आहे. याबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. जर प्रवाशांना असे काही पाहायचे असेल तर घरी पाहा आणि कुठे कोणाच्या गोपनीयतेचे उल्लंघन होत नाही ते पहा, असे कंपनीने म्हटले आहे.

नॉर्दन रेल्वे कंपनीने फ्रेंडली वायफाय नावाच्या एका कंपनीसोबत टायअप केले आहे. या कंपनीद्वारे आपल्या अधिकारात येत असलेल्या रेल्वे स्थानकांवर वायफाय पोहोचवण्याचे काम केले जाते. या कंपनीने प्रवाशांना सूचना केली की, प्रवासादरम्यान मोबाईल किंवा लॅपटॉवर पॉर्न चित्रपट पाहू नये. तसेच, वादग्रस्त भडकाऊ मुद्द्यांवर चर्चा नको आणि आपत्तीजनक जोक्सही सार्वजनिकरित्या सांगू नयेत, असे नियमचे कंपनीने प्रवाशांना घालून दिले आहेत. एकूणच प्रवासातील इतर प्रवाशांना लज्जास्पद वाटेल असा कुठलाही कंटेंट प्रवासादरम्यान ओपन करू नये, अशी सूचना कंपनीने केली.

नॉर्दर्न रेल्वेच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ट्रेशिया विलियम्स यांनी म्हटले की, दरवर्षी लाखों प्रवाशी आमच्या ट्रेनमधून प्रवास करतात. यासर्व प्रवाशांना सुरक्षित आणि उत्तम प्रकारची इंटरनेट सेवा, वायफाच्या माध्यमातून पुरवणे ही आमची जबाबदारी आहे. मात्र, आपण पाहात असलेला किंवा ऐकत असलेला प्रत्येक कंटेंट हा सार्वजनिकपणे वापरता येणारा नसतो. विशेषत: लहान मुलांसाठी हा कंटेंट आमच्या कार्यक्षेत्रात वापरणे योग्य नाही. त्यामुळे, प्रवाशांनी तसा कंटेंट पाहाण्यासाठी आपल्या घरी गेल्यानंतरच वापर करावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top