नवी दिल्ली – रेल्वेच्या वातानुकुलीत डब्यामध्ये पावसाळ्यात गळती होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करीत काँग्रेसने रेल्वे मंत्रालयाची खिल्ली उडवली.रेल्वे मंत्र्यांना उद्देशून ‘मंत्री महोदय काय चाललंय…तुम्ही तर प्रवाशांना रेल्वे प्रवासातच धबधब्याचा आनंद लुटण्याची व्यवस्था केली आहे. प्रवास करताना लोक आता धबधब्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत,’ असा तिरकस टोला काँग्रेसने लगावला आहे.जबलपूर -निजामुद्दीन एक्स्प्रेसमधील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये गाडीच्या छतामधून पावसाच्या पाण्याच्या धारा गळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |