वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गेल्या ४० वर्षात अनेक कायदेशीर कारवाया झाल्या. मात्र त्यांच्यावर अद्याप क्रिमिनल केस दाखल झालेली नसताना, आता पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने मीडियाशी संपर्क साधत २००६ मध्ये ट्रम्पसोबत अफेअर असल्याचे सांगितले आहे. अफेअर लपवण्यासाठी ट्रम्प यांच्या वकिलाने १ लाख ३० हजार डॉलर दिल्याचे म्हटले आहे. अमेरिकेत अशी ऑफर कायदेशीरीत्या मान्य असली तरी पैशांची देवाणघेवाण चुकीच्या पद्धतीने झाली होती. त्यामुळे ट्रम्प यांना अटक होणार हे निश्चित असताना, मात्र या प्रकरणी आपल्याला अटक झाल्यास येथे मृत्यू आणि विनाश होईल असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर न्यूयॉर्क मध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट एटर्नी एल्विन ब्रॅगनहॅटन डिस्ट्रिक्ट एटर्नी एल्विन ब्रॅग या प्रकरणाचा तपास करत आहेत. एल्विन यांना देखील जीवे मारण्याच्या धमक्या असलेले पत्र देखील मिळाले आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर कोणताही व्यक्ती कोणाही व्यक्तीवर कसलेही आरोप करू शकतो असे म्हणत, आपण कोणताही गुन्हा केलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा खोट्या आरोपामुळे होणारा विध्वंस या देशासाठी विनाशकारी असू शकते याची सर्वांना जाणीव असावी, असेही त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांचे समर्थक हिंसाचार करू शकतात, त्याचा नमुना २०२१ मध्ये सर्वानी पाहिले आहे. २०२० मध्ये, ट्रम्प यांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून ६ जानेवारी २०२१ रोजी यूएस कॅपिटलमध्ये हिंसाचार घडवून आणला होता.
त्यामुळे आता ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर लोअर मॅनहॅटनमधील कोर्टहाऊसजवळ तसेच मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट एटर्नी एल्विन ब्रॅगच्या कार्यालयाबाहेर अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहे. पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आले आहे. संपूर्ण न्यूयॉर्कमध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
ट्रम्प यांच्या अटकेच्या
भीतीने न्यूयाॅर्क सतर्क
