ट्युनिशिया: ट्युनिशिया किनारपट्टीवर बोट उलटल्याने २८ स्थलांकरितांचा मृत्यू झाला आहे. ६० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. रविवारी ही दुर्घटना घडली. इटलीला जाण्यासाठी धोकादायक मार्गाने प्रवास करताना हा अपघात घडला. इटलीच्या तटरक्षक दलाने या संदर्भात माहिती दिली की, मागील ४८ तासांत ५८ बोटींमधून ३३०० नागरिकांना वाचवण्यात आले आहे.
ट्युनिशियाहून आफ्रिकेतील सर्वात जवळचे इटालियन बेट असलेल्या लॅम्पेडुसा येथे जाणाऱ्या बोटींवर बचावकार्य करण्यात आले. शनिवारी १९ महिला आणि ९ मुलांना ट्युनिशियाच्या मासेमारी बोटीतून समुद्राच्या मार्गने लॅम्पेडुसा येथे आणण्यात आले. अवैध स्थलांतर थांबवण्यासाठी ट्युनिशियाचेया मासेमारी नौकेची तपासणी केली जात आहे. आफ्रिका आणि मध्यपूर्वैतील गरिबी आणि संघर्षाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी ट्युनिशिामध्ये हे मुख्य केंद्रबिंदू बनले आहे. लिबियातून सर्वाधिक लोक ट्युनिशियामध्ये येत आहेत. या आठवड्यात लॅम्पेडुसातील बहुतेक लोक ट्युनिशियाहून बोटीतून आले होते.
दरम्यान २३ मार्चला ट्युनिशियाच्या आग्नेय किनारपट्टीवर अनेक आफ्रिकन स्थलांतरित नौका बुडाल्या होत्या. २३ मार्चला झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. तसेच ३३ जण बेपत्ता झाले होते. हे सर्व लोक भूमध्य समुद्र पार करून इटलीला जाण्याचा प्रयत्न करत होते.