मुंबई :
राज्यात मागील २ दिवस सुरु असलेल्या सततच्या पावसाचा फटका शेतीला बसला आहे. यामुळे भाजांची आवक घटली असून भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. जुलै महिन्याच्या सुरवातीला शंभरी गाठलेला टोमॅटोचा दर आता प्रतिकिलो सव्वाशे रुपयांपर्यंत महाग होणार अशी शक्यता विक्रेत्यांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सर्व सामन्यांच्या जेवणातून टोमॅटो गायब होतोय की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. मक्याच्या यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे, भाज्या पिकवणार्या राज्यांमध्ये पावसामुळे ठराविक भाज्यांचे दर हे वाढले असल्याचे व्यापारी सांगत आहेत.