परभणी- गंगाखेडपासून काही अंतरावर असलेल्या दुसलगाव पाटी परिसरात टेम्पो आणि स्कूल बसचा आज दुपारी अपघात झाला. स्कूल बस चालक असलेले जय भगवान महासंघ संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष जनार्दन शेषराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. दुसलगाव पाटी परिसरात दुपारी परभणीकडे जाणाऱ्या टेम्पो आणि परभणीहून गंगाखेडकडे येत असलेल्या स्कूलबसची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. हे तालुक्यातील झोला येथील रहिवासी होते.
टेम्पो-स्कूलबसचा अपघात! एकाचा जागीच मृत्यू
