टीम इंडियासाठी एअर इंडियाने नियमित विमान रद्द केले

नवी दिल्ली – टीम इंडियाला बार्बाडोसहून घेऊन येण्यासाठी एअर इंडियाने आपले न्युयॉर्क ते दिल्लीसाठीचे नियमित विमान वापरल्याने न्युयॉर्क विमानतळावर काही प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.टी- २० विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया बेरेल चक्रीवादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकून पडली होती. या संघाला भारतात आणण्यासाठी एअर इंडियाचे बोईंग ७७७ हे विमान वापरण्यात आले. न्युयॉर्क ते दिल्ली प्रवासासाठी निर्धारीत असलेले हे विमान तिथून काढून घेऊन ते बार्बाडोसला पाठवण्यात आले. नंतर भारतीय संघाला घेऊन ते दिल्लीला आले.हे विमान रद्द केल्याची व प्रवाशांची पर्यायी व्यवस्था केल्याची सूचना आधीच दिली होती अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे. यामुळे न्युयॉर्कच्या विमानतळावर प्रवासी अडकले नाहीत. विविध पर्यायी विमानांमधून या प्रवाशांची परतण्याची व्यवस्था करण्यात आली असून काहींनी प्रवाशांची तारीख बदलली असल्याचेही एअर इंडियाने म्हटले आहे. मात्र, काही प्रवाशांना ही सूचना मिळाली नसल्याने त्यांनी या बाबत तक्रार केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top