टास्मानिया
ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया राज्यातील समुद्रकिनाऱ्यावर १५० हून अधिक फॉल्स किलर व्हेल अडकल्या.त्यापैकी फक्त ९० जिवंत राहिल्या. अधिकाऱ्यांनी या व्हेल माशांनाही मारण्याचा निर्णय घेतला.
या व्हेल माशांना परत समुद्रात पाठवता येत नव्हते.बचाव पथकाने त्यांना परत पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र जोरदार वारे आणि समुद्राच्या लाटांमुळे त्या परत आल्या.या व्हेल माशांचा संकट कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी या माशांना मारण्याचा निर्णय घेतला.ज्या भागात व्हेल आढळतात, त्या भागात जाऊ नये,असे आवाहन अधिकाऱ्यांनी लोकांना केले.येथील आदिवासी समुदायासाठी या भागाचे खूप महत्त्व आहे.ऑस्ट्रेलियामध्ये बहुतेक व्हेल टास्मानियाच्या पश्चिम किनाऱ्यावर अडकतात.
टास्मानिया समुद्रकिनाऱ्यावर अडकलेल्या ९० व्हेल मारणार
