नवी दिल्ली – भारतीय रेल्वेकडून वेळोवेळी गाड्या आणि त्यांच्या बांधणीबाबात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.सध्या देशात वंदे भारत एक्सप्रेस वेगाने वाढवली जात आहे.पुढील एका वर्षात टाटा स्टील देशातील सर्वात वेगवान आणि सुसज्ज अशा वंदे भारत एक्सप्रेसच्या २२ गाड्या तयार करणार आहे. भारतीय रेल्वेने एक करार केला असून पुढील दोन वर्षात रेल्वेने २०० नवीन वंदे भारत गाड्या तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
रेल्वे आणि टाटा स्टील यांच्यात झालेल्या करारानुसार,२०२४ च्या पहिल्या तिमाहीत वंदे भारत ट्रेनची पहिली स्लीपर आवृत्ती सुरु करण्याचे रेल्वेचे लक्ष्य आहे. अशा परिस्थितीत रेल्वेच्या बांधणीला गती देण्यासाठी भारतीय रेल्वे आणि टाटा स्टील यांच्यात अनेक योजनांवर करार करण्यात आला आहे. वंदे भारत एक्स्प्रेसमधील फर्स्ट क्लास एसी ते थ्री टायर डब्यांच्या जागा आता टाटा स्टील कंपनी तयार करणार आहेत. टाटा स्टीलला सुमारे १४५ कोटी रुपयांची निविदा दिली आहे.हे काम १२ महिन्यांत पूर्ण करायचे आहे.या कंपनीला वंदे भारत एक्स्प्रेसच्या २२ गाड्यांसाठी सिट्स उपलब्ध करुन देण्याची ऑर्डरही मिळाली आहे. दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेसच्या आसन व्यवस्थेसाठी १४५ कोटी रुपयांची मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाल्यानंतर टाटा स्टीलच्या कंपोझिट डिव्हिजनने या दिशेने काम करण्यास सुरुवात केली आहे.
टाटा स्टील पुढील एक वर्षात