बीड – आठवडाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्योती मेटे यांनी आज बंडखोरी करत शेवटी आपल्या शिवसंग्राम पक्षाकडून बीड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्या नाराज झाल्या . त्यामुळेच ज्योती मेटे यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.