तिरुवनंतपुरम – ज्येष्ठ मल्याळम अभिनेते आणि माजी खासदार इनोसेंट यांचे काल रविवारी रात्री रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. इनोसेंट यांनी वयाच्या ७५ वर्षी अखेरचा श्वास घेतला. इनोसेंट यांना कोरोना, श्वसनाचा आजार, अवयव निकामी झाल्याने हृद्याचा झटका आला आणि त्यामुळे त्यांचे निधन झाले.इनोसेंट यांच्या निधनाने राजकीय विश्वावर आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
काही महिन्यांपूर्वीच इनोसेंट यांनी कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली होती. मात्र श्वसनासंदर्भात त्रास होत असत्याने त्यांना ३ मार्च रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.अखेर काल २६ मार्च रोजी रात्री १०.३० च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.इनोसेंट यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा सॉनेट असा परिवार आहे.बहुआयामी व्यक्तित्व इनोसेंट यांनी पृथ्वीराज सुकुमारन यांच्या २०२२ मध्ये आलेल्या कडुवा सिनेमात अभिनय केला होता. इनोसेंट यांचा हा अखेरचा सिनेमा ठरला. इनोसेंट यांनी आपल्या ५ दशकांच्या कारकीर्दीत ७०० पेक्षा अधिक सिनेमातून अभिनय साकारला. तसेच १२ वर्ष त्यांनी यशस्वीपणे मल्याळम सिनेमा कलाकार संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. इनोसेंट यांनी मळ्यालम सिनेसृष्टीत कॉमेडियन म्हणूनही यश मिळवले. याशिवाय त्यांनी खलनायकाची भूमिकाही केली.तसेच ते मिमिक्री आर्टिस्टही होते. देशात २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही इनोसेंट यांनी प मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून चालुकडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.त्यात त्यांनी काँग्रेस उमेदवार पी सी चाको यांचा पराभव केला होता.
ज्येष्ठ मल्याळम अभिनेते आणि