नाशिक – ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना नाशिक येथशील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. काल पहाटेच्या सुमारास त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. राजुर येथील राहत्या घरी असतानाच पिचड यांना ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मधुकराव चिपड हे ८४ वर्षांचे आहेत. नाशिक येथील ‘नाइन पल्स’ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांना अर्धांगवायू झाल्याचा प्राथमिक अंदा देखील वर्तवण्यात आला आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा वैभव पिचड आणि कुटुंबीय रुग्णालयात आहेत.
ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची प्रकृती खालावली
