नवी दिल्ली – भारतातील नामवंत अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार पद्मश्री बिबेक देबरॉय यांचे आज पहाटे निधन झाले.ते ६९ वर्षांचे होते.देबरॉय हे पुण्याच्या गोखले राजकारण आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलपती राहिले आहेत. ते २०१९ पर्यंत नीति आयोगाचे सदस्य होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून वृत्तपत्रांमध्येही विपूल लेखन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देबरॉय यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. त्यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. देबरॉय यांचा अर्थकारणाव्यतिरिक्त इतिहास, संस्कृती, अध्यात्म अशा विविधांगी विषयांचा गाढा अभ्यास होता.देशातल्या अव्वल धुरिणांच्या मांदियाळीत त्यांचे नाव घेतले जाते. सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून देशाची ध्येयधोरणे ठरविण्यात ते वाकबगार होते,असे मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |