नवी दिल्ली – आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार यांनी देशाचे २६ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ २६ जानेवारी २०२९ पर्यंत राहील. तर आयएएस अधिकारी डॉ. विवेक जोशी यांनी निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोमवार १७ फेब्रुवारीला बैठकीत गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या नियुक्त्यांना मान्यता देण्यात आली होती.
पदभार स्वीकारल्यानंतर ज्ञानेश कुमार म्हणाले की, मतदान हे देशसेवेच्या दिशेने पहिले पाऊल आहे. १८ वर्षे पूर्ण केलेल्या भारतातील प्रत्येक नागरिकाने मतदान केले पाहिजे. निवडणूक आयोग नेहमीच भारतीय संविधान, लोकप्रतिनिधी कायदा आणि त्यांच्या नियमांनुसार मतदारांसोबत होता आहे आणि राहिल.
ज्ञानेश कुमारांनी पदभार स्वीकारला
