सातारा – चांदोबाचा लिंब येथे उद्या दुपारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण तर बेलवंडी येथे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उभे रिंगण होणार आहे. त्यासाठी वारकर्यांची जय्यत तयारी सुरू आहे.संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने लोणंद येथे शनिवारी संध्याकाळी मुक्काम केला होता. ही पालखी आजदेखील लोणंदमध्येच होती. उद्या दुपारी भोजनानंतर वारकरांच्या विठ्ठलाचा जयघोषात ही पालखी चांदोबाचा लिंब येथे पोहोचले. तेथे दुपारी पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडणार आहे. त्यानंतर तरडगाव येथे पालखी मुक्काम करणार आहे. काल संध्याकाळी तुकाराम महाराजांच्या पालखीने बारामतीच्या शारदा विद्यालयात मुक्काम केला होता. त्यानंतर आज सकाळी शारदा विद्यालयातून निघालेली ही पालखी काटेवाडीमार्गे सणसर पालखी तळावर पोहोचली आणि तिथे पालखीने मुक्काम केला. त्यावेळी सणसर येथील लोकांनी या पालखीचे जोरदार स्वागत केले. उद्या सणसर पालखी तळाहून बेलवंडीला निघणार आहे. येथे तुकाराम महाराजांचे पहिले गोल रिंगण पार पडले. त्यानंतर पालखीचा आंथुर्णे पालखी तळावर मुक्काम असणार आहे.
ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे आज पहिले रिंगण
