Home / News / ज्ञानेबांचा संजीवन समाधी सोहळा उद्यापासून सुरू

ज्ञानेबांचा संजीवन समाधी सोहळा उद्यापासून सुरू

पुणे – आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हा सोहळा लाखो वारकरी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पुणे – आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हा सोहळा लाखो वारकरी भाविकांच्या नामजयघोषात २८ नोव्हेंबरला संपन्न होणार आहे.या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २३ नोव्हेंबरला सकाळी ७ ते ९ या वेळेत ह.भ.प. बाळासाहेब पवार, हैबतबाबा वंशज यांच्या हस्ते हैबतबाबांच्या पायरीचे पूजन होऊन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. तर मंगळवारी २६ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी अर्थात आळंदीची यात्रा आहे. या दिवशी रात्री साडेबारा ते पहाटे २ या वेळेत ११ ब्रम्हवृंदांच्या वेदघोषात माऊलींच्या समाधीवर अभिषेक आणि दुधारती होईल. यावेळी दर्शनरांगेत उभे असलेल्या पहिल्या दाम्पत्याला महापूजेचा मान दिला जातो.दुपारी १ वाजता श्रींची नगरप्रदक्षिणा होणार आहे. २७ नोव्हेंबरला पहाटे साडेतीन ते चार या वेळेत खेडचे प्रांतअधिकारी यांच्या हस्ते पंचोपचार पुजा होणार आहे. त्यानंतर दुपारी ४ ते सांयकाळी ७ या वेळेत रथ मिरवणूक होणार आहे. मंदिराच्या गाभार्यात रात्री ११ ते १२ यादरम्यान खिरापत पुजा, फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप होणार आहे. गुरुवारी २८ नोव्हेंबरला महाराजांचा संजीवन समाधी सोहळा उत्सव संपन्न होणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या