वाराणसी – ज्ञानवापी मस्जिदीशी संबंधित असलेल्या सर्व याचिकांवर आता एकत्र सुनावणी घेण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता- ज्ञानवापी प्रकरणी ज्या ७ याचिका न्यायालयात दाखल आहेत त्यावर एकाच न्यायालयात एकत्र सुनावणी होणार आहे.
वाराणसीतील ज्ञानवापी मस्जिदी प्रकरणी वेगवेगळे दावे करणाऱ्या ७ याचिका न्यायालयात दाखल असून त्यावरील सुनावणी प्रलंबित असतानाच या सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी घ्यावी अशी विनंती सीता साहू ,मंजू व्यास, लक्ष्मी देवी,आणि रेखा पाठक या महिलांनी एका पत्राद्वारे न्यायालयाला केली होती . त्यावर सोमवारी जिल्हा न्यायधीश अजयकृष्ण विश्वेश यांच्या समोर सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. आज न्यायालयाने या प्रकरणी निर्णय देताना ज्ञानवापी वरील सर्व सातही प्रकरणाची सुनावणी एकाच न्यायालयात एकत्र घ्यावी असे आदेश दिले आहेत. दरम्यान एएसआई कडून ज्ञानवापीच्या सर्व्हेच्या मागणीवर मस्जिद कमिटीने आक्षेप घेत याचिका दाखल केली आहे . त्यावर पुढील ७ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
ज्ञानवापीवरील सर्व याचिकांची एकत्र सुनावणी घेण्याचे आदेश
