कोल्हापूर – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरच्या ज्योतिबा च्या मुळ मूर्तीचे दर्शन आज सकाळपासून सुरु झाले आहे. या मुर्तीच्या संवर्धन प्रक्रियेमुळे गेल्या मंगळवारपासून या मूर्तीचे दर्शन बंद करण्यात आले होते. त्या ऐवजी भाविकांना उत्सवी मूर्तीचे दर्शन घ्यावे लागले होते.ज्योतिबा मंदिरातील ज्योतिबाची मूर्ती प्राचीन आहे. या मूर्तीची झिज रोखण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे पुरातत्व विभागाने म्हटले होते. त्याची वैज्ञानिक प्रणालीनुसार चार दिवस ही प्रक्रिया चालली. ही प्रक्रिया सुरु असताना भाविकांसाठी कासव चौकात उत्सवी मूर्ती ठेवण्यात आली होती. मंगळवार पासून सुरु झालेली प्रक्रिया काल रात्री पूर्ण झाली. त्यानंतर आज सकाळी ७ वाजून ५ मिनीटांनी मुख्य पुजाऱ्यांनी प्राणप्रतिष्ठा विधी केला. धार्मिक अनुष्ठानानंतर ही मूर्ती दुपारनंतर भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली.
जोतिबाच्या मुळमूर्तीचे दर्शन सुरु
