पुणे – जुन्नर तालुक्याच्या ओतूर आणि परिसरातील गावांमध्ये बिबट्याचे हल्ले अद्याप सुरूच आहेत.आज पहाटे दोन वेगवेगळ्या घटनात दोघेजण जखमी झाल्याची माहिती ओतूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली. सुनील बबन निमसे (४२)हे घराबाहेरील शेडमध्ये झोपले असता पहाटे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. दुसऱ्या घटनेत अभय विलास घोलप हे दुचाकीवरून जात असताना सकाळी साडेसहा वाजता रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झेप घेतली.त्यात घोलप जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच ओतूर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले.जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी मंचर ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले.
जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी
