जुन्नर – घरापासून जवळच असलेल्या शेतात लघुशंकेसाठी गेलेल्या १२ वर्षाच्या एका मुलावर अचानक बिबट्याने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील ओतूर गावात घडली. संजीव बाशीराम झमरे (१२) असे या मृत मुलाचे नाव आहे. तो मूळचा मध्य प्रदेशातील बीडवाणी जिल्ह्यातील टेमला राजपूर येथील राहणारा आहे.
शेतमजूर बाशीराम झमरे हे त्यांच्या कुटुंबासह ओतूर येथे कांदा काढण्यासाठीच आले आहेत. त्यांच्याच मुलावर बिबट्याने हा जीवघेणा हल्ला केला आहे. ओतूर जवळच्या जाकमाथा येथील पांडुरंग ताजने यांच्या शेतात ही घटना घडली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संजीवचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी जुन्नर येथे पाठविला होता.