Home / News / जुन्नरचे १० बिबटे वातानुकूलित ॲंम्ब्युलन्समधून गुजरातला रवाना

जुन्नरचे १० बिबटे वातानुकूलित ॲंम्ब्युलन्समधून गुजरातला रवाना

जुन्नर- जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले १० बिबटे अखेर काल गुजरातच्या जामनगर येथील निवारा केंद्रात पाठविण्यात आले.महाकाय वातानुकूलितॲम्ब्युलन्समधून...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

जुन्नर- जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले १० बिबटे अखेर काल गुजरातच्या जामनगर येथील निवारा केंद्रात पाठविण्यात आले.महाकाय वातानुकूलित
ॲम्ब्युलन्समधून या बिबट्यांना गुजरातकडे रवाना करण्यात आल्याची माहिती जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली.

जगातील सर्वांत मोठे प्राणिसंग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगरमधील ‘वनतारा प्राणीसंग्रहालया’त जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथून ४ मादी व ६ नर असे एकूण १० बिबटे स्थलांतरित करण्यास केंद्रीय प्रणिसंग्रहालय प्राधिकरण यांनी मान्यता दिली होती.त्यानंतर हे बिबटे तीन महाकाय वातानुकूलित ॲम्ब्युलन्समधून रवाना करण्यात आले.एका वातानुकूलित ॲम्ब्युलन्स मध्ये ५ बिबटे नेण्याची क्षमता असून दोन ॲम्ब्युलन्समध्ये १० बिबटे तर एक ॲम्ब्युलन्स ही अतिताडीच्या मदतीसाठी सोबत ठेवली होती. जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे या तीन ॲम्ब्युलन्स काल सकाळी पोहचल्या. सोबत गुजरात येथील झु मॅनेजर, पशुवैद्यकीय अधिकारी व २३ मॅनेजमेंट टीमचे सदस्य पोहचले व माणिकडोह व वनविभाग जुन्नरचे १५ अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने लगेचच दिवसभरात १० बिबटे गुजरातमधून आणलेल्या पिंजऱ्यात दिवसभरात चढवण्यात आले.हायड्रॉलिक पद्धतीने दरवाजे उचलण्याची सोय या महाकाय ॲम्ब्युलन्समध्ये असल्याने हे सर्व बिबटे सुरक्षितपणे ॲम्ब्युलन्समध्ये चढवले गेले.

Web Title:
संबंधित बातम्या