वॉशिंग्टन
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेच्या (नासा) जुनो या अंतराळयानाने गुरु या उपग्रहाच्या चंद्राचे छायाचित्र टिपले असून सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहेत. ही छायाचित्रे जुनोने ३१ जुलै रोजी टिपली आहेत. या छायाचित्रात गुरू आणि त्याचा चंद्र एकत्र दिसत आहेत. गुरुचा हा चंद्र तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा चंद्र आहे. या चंद्रच्या पृष्ठभागावर शेकडो ज्वालामुखी आहेत. जुनोने टिपलेल्या या छायाचित्रावर शास्त्रज्ञांनी प्रक्रिया करत त्या छायाचित्राचे रंग आणि सुस्पष्टता वाढवली आहे. हे छायाचित्र घेण्यात आले तेव्हा जुनो आणि गुरुच्या चंद्रामध्ये ५१,७७० किमी एवढे अंतर होते. गुरु हा ग्रह ग्रहमाालिकेतील सर्वात मोठा ग्रह आहे. त्याचे ८० पेक्षाही अधिक चंद्र आहेत. त्यापैकी युरोपासारखे काही चंद्र अधिक महत्त्वाचे आहेत. ५ ऑगस्ट २०११ रोजी नासाने जुनो हे अंतरराळयान लाँच केले होते.