अहमदाबाद – गुजरात राज्यातील जुनागढ परिसरात आज सकाळी कार अपघात झाला. या घटनेत दोन कार एकमेकांवर समोरासमोर आदळल्या. यामध्ये परीक्षेला जात असलेल्या पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या कारमधील दोघांचा मृत्यू झाला आहे.
जुनागढ-वेरावर महामार्गावर अपघाताची दुर्घटना घडली. भंडुरी गावाजवळ आल्यावर टायर फुटल्याने एका कारचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित कार डिव्हायडरवरून विरुद्ध बाजूने येणार्या मार्गिकेमध्ये घुसली. यावेळी समोरून येणाऱ्या कारला ती जोरदार आदळून भीषण अपघात झाला. यामध्ये दोन्ही कारचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर या अपघातात एकूण ७ जणांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.