पुणे – पुण्यात जीबी सिंड्रोम रुग्णसंख्या ५९ झाली आहे. तर त्यापैकी १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.त्यामुळे पुण्याच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या एकूण ५९ रुग्णांपैकी ३८ पुरूष आणि २१ महिला आहेत. त्यापैकी ग्रामीण भागात ३३ रुग्ण आढळले असून महापालिकेच्या हद्दीत ११ रुग्ण आहेत. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत १२ रुग्ण आहेत. त्यापैकी सिंहगड रस्ता परिसरात रुग्णसंख्या जास्त असल्याने आरोग्य विभागाने तेथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. याचबरोबर त्या परिसरातील खाद्यपदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडून तपासले जाणार आहेत. काही रुग्णांच्या तपासणीत त्यांना कॅम्पायलोबॅक्टर जेजूनी जीवाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दूषित पाणी अथवा अन्नातून हा संसर्ग होत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जीबी सिंड्रोम रुग्णसंख्या ५९ तर १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर
