जीन्स घातल्यामुळे मॅग्नस कार्लसन जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ बाहेर

न्यूयॉर्क – प्रसिद्ध बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याला जीन्स परिधान केल्यामुळे जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेसाठी बाहेर काढले. त्याला एफआईडीई च्या ड्रेस कोडचे उल्लंघन प्रकरणी २०० डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धेच्या नियमांनुसार जीन्स घालण्यास परवानगी नाही. स्‍पर्धेची तिसरी फेरी सुरु असताना कार्लसन याला ड्रेस कोडचे पालन करण्याबाबत विनंती करण्यात आली होती. मात्र मॅग्नस कार्लसन याने आठव्‍या फेरी अखेरपर्यंतही आपली भूमिका कायम ठेवत आपण पोशाख बदलला नाही. आपण उद्या ड्रेस कोडचे पालन करू, असे त्‍याने सांगितले होते. पण आयोजकांनी नवव्‍या फेरीसाठी कार्लसनला पेरिंगमधून वगळले. यामुळे तो अपात्र ठरला. याचा निषेध म्हणून मॅग्नस कार्लसन याने यापुढे फिडेच्‍या कोणत्‍याही स्‍पर्धेमध्‍ये सहभागी होणार नाही, असे म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top