जीएसटी दर टप्पे बदला संदर्भात मंत्रिगटाची २५ सप्टेंबरला बैठक

नवी दिल्ली – सेवा कर (जीएसटी) दरटप्पे बदलाबाबत मंत्रिगटाची २५ सप्टेंबर रोजी गोव्यात बैठक होणार आहे. या बैठकीत दर टप्पे आणि दरांमध्ये बदल करण्यावर चर्चा होणार आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यीय मंत्री गटाची शेवटची बैठक २२ ऑगस्ट रोजी झाली आणि त्यांनी ९ सप्टेंबर रोजी जीएसटी परिषदेला स्थिती अहवाल सादर केला होता. ऑगस्टच्या बैठकीत समितीने केंद्र आणि राज्यांमधील कर अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या फिटमेंट कमिटीला काही वस्तूंवरील कर दर बदलाच्या परिणामाचे विश्लेषण करण्यासाठी अधिक आकडेवारी गोळा करण्याचे काम दिले होते. याद्वारे जीएसटीच्या काही वस्तूंवरील कर दरांमधील बदलांच्या परिणामांचे विश्लेषण करणारा अहवाल सादर केला जातो. आता या अहवालाच्या आधारे मंत्रिगट चर्चा करतो. सध्या, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) ही ५, १२, १८ आणि २८ टक्के टप्प्यांची कररचना आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top