चीन – सध्या अमेरिका आणि इतर काही राष्ट्रांच्या रडारवर आहे. अशा परिस्थितीत आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी चीनने मोठी रणनीती आखली आहे. चीन आपली राजधानी बीजिंगजवळ जगातील सर्वात मोठं लष्करी कमांड सेंटर बनवण्याची तयारी करत आहे. हे सेंटर अणुयुद्धाच्या परिस्थितीत देशातील नेत्यांचं संरक्षण करण्यास सक्षम असेल. खास करून राष्ट्रपती शी झिनपिंग यांच्यासाठी जगातला सर्वात मोठा आण्विक बँकर बनवला जात आहे . तसेच चीनचे कमांड सेंटर राजधानी बीजिंगपासून सुमारे ३२ किमी दक्षिण-पश्चिम भागात आहे. तब्बल १५०० एकर जागेमध्ये उभारण्यात येत असलेलं हे कमांड सेंटर अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचं मुख्यालय असलेल्या पेंटागॉनपेक्षा १० पटीने अधिक मोठं आहे.संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या लष्करी कमांड सेंटरमध्ये भक्कम सैनिकी बंकर उभारले जाऊ शकतात, हे बंकर अणुयुद्धाच्या परिस्थितीत राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासह वरिष्ठ सैनिकी अधिकाऱ्यांचं संरक्षण करण्यास सक्षम असतील. चीनकडून उभारण्यात येत असलेल्या या कमांड सेंटरच्या बांधकाम स्थळाचे सॅटेलाईट फोटो ब्रिटिश वर्तमानपत्र फायनान्शियल टाइम्सला प्राप्त झाले आहेत. यामध्ये या ठिकाणी दिवस-रात्र काम सुरू असल्याचं दिसत आहे.
जिनपिंग यांच्यासाठी चीन बनवतोय जगातला सर्वात मोठा आण्विक बंकर
