जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात साक्ष देण्यासाठी पोलिसांचा दबाव!

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात साक्ष आणि पुरावे द्यावे, यासाठी वैभव आणि त्यांचे सहकारी यांच्यावर मोठा दबाव पोलिसांकडून टाकण्यात येत होता. या दबावाला कंटाळून आव्हाड यांचे बॉडीगार्ड वैभव कदम यांनी आत्महत्या केली. केवळ जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून हे सर्व प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

आज पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलताना म्हणाले की, \’वैभव कदम यांनी आत्महत्या का केली, यांच्या खोलात कुणी गेले का? वैभव कदमला पोलिस स्टेशनला बोलवत टॉर्चर करण्यात येत होते, दोन तीन वर्षांपूर्वी झालेल्या गुन्ह्यात जितेंद्र आव्हाड आरोपी आहेत. त्यांच्याविषयी आम्ही जे सांगतो तसे बोला, जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात साक्ष द्या, त्यासाठी त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधाने करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यासाठी ठाणे पोलिस प्रयत्न करत आहेत. त्यासाठी वैभव कदम यांच्यासोबत असलेल्या ६ ते ७ पोलिस कर्मचाऱ्सांना त्रास दिला जात आहे. खूप वेळ चौकशीसाठी बसवले जात आहे. आम्ही बोलतो तसे साक्ष आणि पुरावे तुम्ही द्या, असे म्हणत वैभव आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दबाव टाकण्यात येत होता. त्यामुळे वैभव कदम यांनी आत्महत्या केली, यामागचे कारण शोधण्यासाठी खोलात जाण्याची गरज आहे.\’

Scroll to Top