जालना – जालन्यातील जुन्या एमआयडीसी भागामध्ये कुलरच साहित्य बनवनाऱ्या कंपनीला काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे कुलरचे साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
स्थानिकांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ३ बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीमुळे मोठ्या प्रमणात असल्यामुळे धुराचे लोट पसरले होते. आगीचे अद्याप कारण अस्पष्ट आहे.
जालन्यात कुलरचे साहित्य बनवणाऱ्या कंपनीला आग
