Home / News / जालन्यात एसटी बसचा अपघात! २ जणांचा मुत्यू! २० जण जखमी

जालन्यात एसटी बसचा अपघात! २ जणांचा मुत्यू! २० जण जखमी

जालना – जालना जिल्ह्यातील नाव्हा गावालगत एसटी व ट्रकचा भीषण अपघात झाला. एसटी जालन्याहून माहुरगडाच्या दिशेने जात होती. तर ट्रक...

By: E-Paper Navakal

जालना – जालना जिल्ह्यातील नाव्हा गावालगत एसटी व ट्रकचा भीषण अपघात झाला. एसटी जालन्याहून माहुरगडाच्या दिशेने जात होती. तर ट्रक सिंदखेड राजा येथून जालन्याच्या दिशेने येत होता. यावेळी ट्र्क आणि एसटीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात २० जण जखमी असून दोघांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. काही जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे तर काहींवर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी सुरु आहेत. जखमींपैकी २ प्रवाशांची प्रकृती अत्यवस्थ आहे. या अपघाताचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या