जालना – उत्तर भारतात थंडी वाढल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मोसंबीची मागणी घटली आहे. त्यामुळे मोसंबीला ३ ते १० रुपये किलोपर्यंतचा निचांकी दर मिळत असल्याने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.परिणामी जालन्यातील मोसंबी मार्केट आजपासून पुढील सहा दिवस हे मार्केट बंद राहणार आहे.थंडीमुळे उत्तर भारतासह,कानपूर आणि बनारस या मार्केटमध्येदेखील मोसंबी विक्रीसाठी अडचणी येत आहेत. त्यासोबत दिल्ली आणि जयपूर येथील मोसंबी बाजार बंद आहे. त्यामुळे जालन्याच्या मोसंबीची मागणी घटली आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील मोसंबी मार्केट ७ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने घेतला.या कालावधीत शेतकऱ्यांनी मोसंबी विक्रीस आणू नये,असे आवाहनदेखील बाजार समिती प्रशासनाने केले आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |