नवी दिल्ली – चालू वित्तीय वर्षाच्या चौथ्या तिमाहीत होणारी कामगारांची पगारवाढ इन्फोसीस या माहिती क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने पुढे ढकलली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कंपनीने पगारवाढ दिली होती.इन्फोसीस दरवर्षी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पगारवाढ जाहीर करते. मात्र यावर्षी पगारवाढ पुढे ढकलल्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्र अद्याप अनिश्चिततेच्या फेऱ्यातून बाहेर पडलेले नाही, असे संकेत मिळाले आहेत.अमेरिकेत नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या २० जानेवारी रोजी पदभार स्वीकारणार आहेत. त्यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर अमेरिकेच्या आर्थिक धोरणात मोठे बदल होण्याची शक्यता असल्याने जगभरात त्याचे बरे-वाईट परिणाम होणार आहेत. त्यामुळे सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मंदीचे सावट आहे. या पार्श्वभूमिवर इन्फोसिसने पगारवाढीचा निर्णय पुढे ढकलला असे सांगितले जाते.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |