ओटावा – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना आता त्यांच्याच पक्षातून विरोधाचा सामना करावा लागत आहे. भारत-कॅनडा वादावरुन त्यांच्या लिबरल पक्षाच्या खासदारांनी त्यांना चौथ्यांदा निवडणूक न लढवण्याचा सल्ला दिला. त्यासोबत ट्रुडो यांनी आपल्या पदावरुन पायउतार व्हायला हवे, असे खासदारांनी सांगितले.तीन तास चाललेल्या लिबरल खासदारांच्या बैठकीत खासदारांनी आपले पत्र जस्टिन ट्रुडो यांना वाचून दाखवले. ट्रुडो यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि चौथ्यांदा निवडणूक लढवू नये, याबाबत ट्रुडो यांनी २८ ऑक्टोबरपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा त्यांना अनपेक्षित परिणामांना सामोरे जावे लागू शकते असे या पत्रात खासदारांनी म्हटले. याआधी ट्रूडो यांनी पुन्हा निवडणूक रिंगणात उतारण्याची इच्छा बोलून दाखवली होती. गेल्या १०० वर्षांत एकाही कॅनडाच्या पंतप्रधानाला सलग चार वेळा विजय मिळवता आलेला नाही.
जस्टिन ट्रुडो यांना पक्षातूनच विरोध पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हा
