फ्रँकफर्ट – जर्मनीतील फ्रँक फर्ट येथील पाकिस्तानी वाणिज्य दूतावासावर अज्ञातांच्या एका गटाने हल्ला केला. दुतावासावरील पाकिस्तानी झेंडा काढून तिथे अफगाणिस्तानचा झेंडा लावला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने त्यावर कारवाई करण्याची विनंती जर्मन सरकारला केली आहे.फ्रँकफर्ट मधील पाकिस्तानी दूतावासावर एका टोळक्याने हल्ला केला. त्यांनी इमारतीवर दगडफेक केली, त्याचप्रमाणे परिसराची तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी इमारतीच्या बाहेरचा पाकिस्तानचा झेंडा खाली ओढून त्याठिकाणी अफगाणिस्तानचा झेंडा लावला. आंदोलकांनी पाकचा झेंडा जाळण्याचाही प्रयत्न केला.पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जर्मनीला या अतिरेकी टोळीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या इमारतीतील आपल्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आहे. वाणिज्य दूतावासाचे संरक्षण करण्याची जर्मनीची क्षमता नाही का? जर्मनीने सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्यांची चौकशी करावी.
जर्मनीतील पाकिस्तानी दूतावासावर हल्ला
