बिजिंग – जर्मनीने तब्बल २२ वर्षांनंतर आपली एक युध्दनौका तैवानच्या समुद्री हद्दीत पाठवली आहे. याला चीनने जोरदार आक्षेप घेतला आहे.
व्यापारी स्पर्धा आणि रशिया – युक्रेन युध्दाच्या पार्श्वभुमीवर उभय देशांचे संबंध सध्या ताणवग्रस्त बनले आहेत. अशा परिस्थितीत जर्मनीने आपली युध्दनौका तैवानच्या समुद्री हद्दीत पाठवून जर्मनी-चीन कराराचे उल्लंघन केले आहे,असा दावा चीनने केला आहे.
जर्मनीने मात्र चीनच्या या दाव्याचे खंडन केले आहे. बॅडेन-वुर्टेम्बर्ग ही युध्दनौका सध्या तैवानच्या सामुद्रधुनीतून प्रवास करीत आहे.युध्दनौकेच्या पुढील प्रवासाबद्दल काही माहिती देता येणार नाही. मात्र हा जलमार्ग आंतरराष्ट्रीय समुद्री मार्ग आहे, त्यामुळे जर्मनीच्या युध्दनौकेवर आक्षेप घेण्याची गरज नाही,असे जर्मनीचे चॅन्सेलर मंत्री ओलाफ शोल्झ यांनी सांगितले.