श्रीनगर – जम्मू तावी स्थानकाचे नुतनीकरण तसेच या मार्गावरील इंटरलॉकिंगचे काम पूर्ण करायचे असल्याने १५ जानेवारी ते ६ मार्च या कालावधीत या मार्गावरील २४ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे जवळपास दीड महिन्यांपर्यंत हाल होणार आहेत.
वैष्णव देवीला जाणार्या भाविकांमुळे जम्मू-तावी मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी असते. तसेच पंजाब, हरयाणा आणि दिल्लीमधूनही मोठ्या संख्येने पर्यटक कटरा आणि काश्मीरकडे जात असतात.त्यामुळे हा मार्ग अत्यंत वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखला जातो . त्यामुळे मधल्या काही काळात या मार्गावरील तांत्रिक दुरुस्ती तसेच काम रखडले होते. शिवाय जम्मूतावी रेल्वे स्थानकाचे नुतनीकरण रखडले होते. अखेर १५ जानेवारीपासून हे काम हाती घेण्यात आले असून १५ जानेवारी ते ६ मार्च या काळात या मार्गावरील २४ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत तर काही ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले आहेत.