बांदीपोरा – जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील शिवरी येथील सशस्त्र पोलीस छावणीला काल रात्री आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली.
आग लागल्याचे कळताच पोलीस छावणी रिकामी करण्यात आली. त्यामुळे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळलेले नाही. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
जम्मू – काश्मीर बांदीपोरा पोलीस छावणीला आग
![](https://navakal.in/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Image-2024-12-25-at-5.06.19-PM-1024x576.jpg)