कुपवाडा – जम्मू काश्मीरच्या कुपवाडासह इतर दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत विघ्न आणण्याच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून सीमेपलीकडून काही दहशतवादी आल्याची माहिती लष्कराला मिळाल्यानंतर या ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
काल जम्मू-काश्मीरमध्ये तीन चकमकी झाल्या. राजौरीमधील खेडी मोहरा लाठी व दंथल विभागात रात्री चकमक झाली. तर कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार आणि माछीलमध्ये झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना ठार कंठस्नान घालण्यात आले. यातील २ दहशतवाद्यांना माछील गावात तर एकाला तंगधार मध्ये मारण्यात आले. राजौरी जिल्ह्यातही सुरक्षा दलाबरोबर मोठी चकमक झाली. लष्कराने या भागात घेराबंदी केली आहे. लष्कराने विविध भागातील सुरक्षाव्यवस्था अधिक कठोर केली आहे.