बांदीपोरा – जम्मू काश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात आज भारतीय सैन्याचा एक ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला असून इतर ५ जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जवानांना घेऊन जाणारा एक ट्रक बांदीपोरा येथील सदर कूट पायीन भागात एका डोंगरावरून जात असताना अचानक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो खाली दरीत कोसळला. यात २ जवानांचा जागीच मृत्यू झाला. यात ५ जण गंभीर जखमी झाले. गेल्या पंधरा दिवसांतील सैन्याच्या ट्रकला झालेला हा तिसरा अपघात आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |