नौशेरा – जम्मू काश्मीरमध्ये २ दहशतवादी ठारनौशेराजम्मू काश्मीरच्या नौशेरा व लाम भागात काल रात्री झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे व दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यापासून दहशतवाद्यांकडून हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा दलाने लष्कराच्या सहाय्याने कालपासून शोधमोहिम राबवली. यावेळी जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी लष्करावर हल्ला केला. लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक शस्त्रात्रे व दारुगोळा तसेच इतर सैनिकी उपकरणे जप्त करण्यात आले. चार दिवसांपूर्वीच पुलवामामध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्याचा एक कट उधळून लावला. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या एकाला यावेळी ताब्यात घेतले होते. त्यानंतर लगेच हा दुसरा हल्ला झाला.
जम्मू काश्मीरमध्ये २ दहशतवादी ठार
