श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी ८.३५ वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूंकपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी होती, अशी माहिती राष्ट्रीय भूंकप विज्ञान केंद्राने दिली आहे. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. दरम्यान, काल भूतानमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता २.३ रिश्टर स्केल इतकी होती, अशी माहिती राष्ट्रीय भूंकप विज्ञान केंद्राने दिली आहे. या भूकंपातदेखील कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.